
(Nagpur)भारताची आन, बान आणि शान असलेल्या नौसेनेत सब लेफ्टनंट म्हणुन नागपूरची कन्या (Renuka Laxmikant Sakhalkar) रेणुका लक्ष्मीकांत साखळकर हिची नुकतीच नियुक्ती झाली आहे. वाडी सारख्या ग्रामीण परिसरात राहून लहाणपणापासुनच देशसेवेचा ध्यास असलेल्या रेणुकाचे प्राथमिक शिक्षण जिंदल पब्लीक स्कुल तसेच हायस्कुलचे शिक्षण आयुध निर्माणी अंबाझरी येथील केंद्रीय विद्यालयात झाले आहे. तीने नांदेडच्या एस. जी. जी. एस कॉलेज मधुन माहिती व तंत्रज्ञान विषयात बी. टेक केले आहे. अभियांत्रीकीची पदवी प्राविण्यासह प्राप्त केल्यानंतर भारतीय सेनेत अधिकारी पदाकरीता तीने एसएसबी पुर्व परिक्षा व कठीणतम सत्र मुलाखतीच्या फेरी उत्तीर्ण केल्या. विशेष म्हणजे सलग चार वेळा अपयश येवुनही तीने जिद्द न सोडता पाचव्या प्रयत्नात वयाच्या २४ व्या वर्षी आपले यश गाठले.
रेणुकाचे वडील (Laxmikant Sakhalkar)लक्ष्मीकांत साखळकर जिल्हा व सत्र न्यायालयात सहा. अधिक्षक पदावर कार्यरत असुन ते नागपूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व इतर सामाजीक संस्थावर पदाधिकारी सुध्दा आहेत. तसेच आई मीरा साखळकर ही व्हिजन ४ मिडीया या जाहिरात एजंसीचे संचालन करते. वडिलांपासुन सामाजीक सेवेचा कौटुंबीक वारसा असलेल्या रेणुका साखळकर च्या यशामुळे नागपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण प्राप्त झालेला आहे.

आपण ठरविलेल्या लक्ष्याप्रती ठाम असणे, प्रत्येक अपयशातुन झालेल्या चुकींचा धडा घेवून पुन्हा प्रयत्न करणे, भाषा, विज्ञानाचा अभ्यास, शारिरीक सराव, देश व जगातील वर्तमान घडामोडींवर लक्ष तसेच इतिहासाचा अभ्यास यश मिळविण्याकरीता आवश्यक असल्याचे तीने सांगीतले आपल्या लक्ष्याप्रती प्रामाणिक राहून सतत प्रयत्न करण्याचे आवाहन रेणुका साखळकर यांनी युवक- युवतींना केले. आपल्या यशाकरीता अनेक लोकांनी केलेल्या मदतीसाठी व | मार्गदर्शनाकरीता तीने कृतज्ञता व्यक्त केली.