सूड घेण्यासाठी सुनेनं पाच जणांना संपविलं!

0

(Gadchiroli)गडचिरोली: सूड उगविण्यासाठी सुनेने विषप्रयोग करुन कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याची भयानक घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागावमध्ये उघडकीस आली आहे. (Gadchiroli Murder Mystery) दोन दिवसांपूर्वी या प्रकरणा उलगडा झाल्यावर घरातील सुनेनेच नवऱ्याच्या मामीच्या मदतीने सुडापोटी घरातील पाच जणांना संपविल्याचा प्रकार उघडकीस आला. सासरच्यांच्या छळाला कंटाळून सुनेने आणि त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी मामीने हे कारस्थान रचल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी (Sanghamitra)संघमित्रा (वय २५) व मामी (Roza Ramteke)रोजा रामटेके (वय ५२) या दोघींना अटक केली.

या दोघींनी कट रचून केलेल्या हत्याकांडात २० दिवसांत सासू-सासरे (Shankar Thiruji Kumbhare)शंकर तिरुजी कुंभारे (वय ५२ वर्ष), (Vijaya Shankar Kumbhare) विजया शंकर कुंभारे, (वय ४८), त्यांची विवाहित कन्या (Komal Vinod Dahagavkar)कोमल विनोद दहागावकर (वय २८ वर्ष, रा. गडअहेरी), मावशी  (Ananda Urade)आनंदा उराडे (वय ५० वर्ष, रा. चंद्रपूर) आणि मुलगा (Roshan Shankar Kumbhare) रोशन शंकर कुंभारे (वय २८ वर्ष) या पाच जणांची हत्या केली. यासाठी आरोपी संघमित्रा कुंभारे हिने सुरुवातीला धोतऱ्याच्या बियांचे विष वापरण्याचा प्रयत्न केला. पण ते पाण्यात मिसळल्यावर रंग हिरवा होत असल्याने व वासही येत असल्याने तिने इंटरनेटवर जहाल विषाचा शोध घेऊन रंगहीन, वास न येणारे व हळुहळु काम करणारे रसायन परराज्यातून मागवले व ते कुटुंबीयांना जेवणातून दिले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे. २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना चंद्रपूरला नेण्यात आले. पण त्यानंतर शंकर यांचीही अचानक प्रकृती खालावली. दोघांवर नागपुरात उपचार सुरु असताना शंकर आणि विजया दोघांचा २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा शंकर कुंभारे यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर ही माहेरी आली होती. पण काही दिवसांनी तिची प्रकृती अचानक खालावली व ८ ऑक्टोबरला तिने वाटेतच प्राण सोडले. त्यानंतर शंकर कुंभारे यांचा मुलगा रोशन कुंभारे (वय २८ वर्ष ) याचा पुढच्या आठ दिवसातच म्हणजे १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला. रोशनची मावशी आनंदा उंदीरवाडे (वय ५० वर्ष, रा. चंद्रपूर) ही महागावला आली होती. पण तिची देखील प्रकृती खालावल्याने १४ ऑक्टोबरला ती देखील दगावली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा ही मूळची अकोला येथील रहिवासी असून ती स्वत: उच्चशिक्षित आहे. संघमित्रा आणि रोशन कुंभारे हे एकत्रच पोस्ट खात्यात काम करत होते. तेथेच त्यांचे सूत जुळले होते. डिसेंबर 2022 मध्ये त्या दोघांनी विवाह केला होता. संघमित्राच्या वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. संघमित्राच्या लग्नानंतर तिच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका येऊन एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. ज्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाले. त्यातच सासरचे लोक छळ करत असल्याचे सांगत संघमित्राने अख्खं कुटुंब संपविण्याचे कारस्थान रचले होते. यात संपत्ती हडप करण्यासाठी रोशनच्या मामीने तिला मदत केली.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा