“मुख्यमंत्रीपदच मला सोडत नाही!” : अशोक गेहलोत

0

 

(Jaypur)जयपूर : मी कधीपासून मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे पण, हे पदच मला सोडत नाही. ते मला कधी सोडेल असे वाटत नाही, असा सूचक इशारा (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot)राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी दिल्लीतील बोलताना दिला. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीनंतर निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेतृत्व अशोक गेहलोत यांचे पंख छाटण्याच्या तयारीत असताना गेहलोत यांनी एकप्रकारे काँग्रेस हायकमांड आणि त्यांचे प्रतिस्पर्धी (Sachin Pilot)सचिन पायलट यांना हा इशारा दिल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर गेहलोत म्हणाले की, (Sonia Gandhi)सोनिया गांधी, (Rahul Gandhi)राहुल गांधी व (Priyanka Gandhi)प्रियंका गांधी यांचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणून तर त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. खरेतर कोणी पदाची अभिलाषा बाळगू नये. मोदींविरोधात थेट लढणारे देशात राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत, त्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा