“हमासच्या बाजुनं लढण्यासाठी ते सुप्रिया सुळेंनाही पाठवतील”: हेमंत सरमा

0

(Mumbai)मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे पॅलिस्टींनीना डावलून (Israel)इस्त्रायलच्या समर्थनाची भूमिका घेत असल्याची टीका (NCP President Sharad)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यावर भाजप नेत्यांनी त्यांचा समाचार घेतला. अशात वादग्रस्त विधानांचीही भर पडत आहे. “सद्यस्थिती पाहता शरद पवार हमासच्या बाजुनं लढण्यासाठी (Supriya Sule)सुप्रिया सुळे यांना गाझाला देखील पाठवू शकतात,” असे वादग्रस्त वक्तव्य (Assam Chief Minister Hemant Biswa Sarma)आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केले आहे. शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर विचारले असता सरमा यांनी ही टिप्पणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, ज्या भागात युद्ध सुरु आहे, ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झाले आणि इस्रायल हा देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचे नाही. मात्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते वाजपेयींपर्यंत सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे.मात्र, मोदी हे इस्त्रायलची बाजू घेत आहेत, असा दावा पवारांनी केला. दरम्यान, भाजप नेते (Vinod Tawde)विनोद तावडे यांनीही पवाराच्या भूमिकेचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या पाठीशी उभे राहिले आहेत, यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की सध्या जगात सुरू असणारी लढाई ही दहशतवाद आणि दहशतवादविरोधी राष्ट्रे यांच्यादरम्यान सुरू आहे. अशावेळी दहशतवादी देशाविरोधात उभे राहून इस्रायलला पाठिंबा देणे क्रमप्राप्तच आहे. मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २६/११चा दहशतवादी हल्ला यांसारख्या घटना, त्यामध्ये किती लोक बळी गेले, हे सर्व शरद पवार यांनी आठवावे. असे असतानाही शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठीशी का उभे राहत आहेत? हे सर्व मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, हे जनता जाणतेच! असं म्हणत विनोद तावडेंनी शरद पवारांवर टीका केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांवर याच मुद्द्यावरुन टीका केली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र, त्याचवेळी भारताने दहशतवाद, मग तो कुठल्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे, याकडे लक्ष वेधले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा