
नागरिकांनी व्यक्त केला संताप
(Gondia)गोंदिया – बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील 36 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांवर पाणी पुरविणाऱ्या कंत्राटदाराला6 मागील दोन महिन्यांपासून देखभाल-दुरुस्तीचे पैसे न दिल्याने कंत्राटदाराने 15 ऑक्टोबरपासून बनगाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी बंद केले आहे.
(Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे ‘घर घर नल, घर घर जल’ ही मोहीम राबवीत असताना या मोहिमेचे पाणीपुरवठा बंद करून जिल्हा परिषद आपल्या ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे. कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाईपलाइनला गळती, कधी देखभाल-दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाहीत. परिणामी 36 गावांवर एक कोटी रुपये थकीत आहेत, तसेच जिल्हा परिषदेवर देखभाल दुरुस्तीचे जुन्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीचे 5 लाख, तर नवीन कंत्राट सांभाळणारे जैन यांचे 40 लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीचे देखील 40 लाख रुपये या योजनेचे आहेत.
