
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांची आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये (Rajguru Nagar) सभा झाली. जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली. बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्याने दिला. यामुळे स्टेजवर काही काळ गोंधळाचं वातावर निर्माण झालं होतं. मनोज जरांगेंच्या भाषणानंतर राजगुरूनगरच्या सभेत एका तरुणानं चांगलाच राडा केला. जरांगे भाषण आटोपून स्टेजवर उभे असताना अचानक हा मराठा तरुण स्टेजवर आला. त्यानं माइक हातात घेतला. मला बोलू द्या, नाहीतर आत्महत्या करेन, अशी धमकीच त्यानं माइकवरून दिली. तेव्हा पोलिसांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. जरांगेंनी या संतप्त तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो जरांगेंच्या पायाही पडला.. मात्र त्याचा हट्ट कायम होता. तो ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांनी त्याला उचलून स्टेजवरून नेल.