
मुंबई : कंत्राटी भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला आहे. कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे आणि तेच आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. (Contractual Recruitment GR )
आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी सांगितले की, कंत्राटी भरती संदर्भात पहिला जीआर १३ मार्च २००३ रोजी काढण्यात आला होता. त्यावेळीच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या सरकारमध्ये कंत्राटी भरती झाली. २०१० साली अशोक चव्हाणांनी पहिला जीआर काढला. सहा हजार कंत्राटी पदाचा जीआर काढण्यात आला. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काळात कंत्राटी शिक्षण भर्तीचा जीआर काढण्यात आला. २०१४ साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला एमसीए, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पोस्ट साठी हा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर काढण्यात आला. १ सप्टेंबर २०१२१ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळी कंत्राटी भर्तीचा जीआर काढण्यात आला. १५ वर्षाकरता कंत्राटी भर्तीसाठी एजन्सी तयार करण्यात आली . आमच सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट जास्त आहे, हे माझ्या लक्षात आल्यानंतर यावर लक्ष घातले. कंत्राटी भरतीची सुरवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.