
अमरावती-मराठा आरक्षण संदर्भात
काल महत्वाची बैठक पार पडली.
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार केला पाहिजे की, आरक्षण टिकणारं हवंय की दिलेलं हवं. अभ्यासकांनी सुद्धा काही इनपुट देऊन सरकारला मदत केली पाहिजे असे मत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
4 हजार तरुणांना आरक्षण देऊन त्यांना नोकरी सुद्धा सरकारने दिली आहे. आरक्षण दिल्यानंतरही सरकार आपलं दुश्मन आहे, अश्या भूमिकेत काम करण्याच काही कारण नाही.
तज्ञ म्हणताय की आत्ता तुम्हाला हे राजकीय आरक्षण देता येईल. पण गायकवाड कमिशनरने अभ्यास करून दिलेलं नाही टिकणार. त्यामुळे टिकणारं आरक्षण देण्याचं प्रयत्न सरकारचा आहे असेही पाटील म्हणाले.