न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातून पांड्या दुखापतीमुळे बाहेर

0

पुणे : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झालेला भारताचा अष्टपैलू खेळाडून हार्दिक पांड्या सर्वात महत्वाच्या अशा न्यूझीलंडविरुद्ध २२ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. काल गोलंदाजी करताना पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती व लंगडतच मैदानाबाहेर गेला. त्याच्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले असून त्याची दुखापत गंभीर नसली तरी न्यूझीलंडमधील सामन्यात त्याला खेळता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (Hardik Pandya Injury)
पुण्याच्या रुग्णालयात उपचार घेतल्यावर आता पांड्या उपचारासाठी बेंगळुरू येथील एनसीएमध्ये जाणार आहे.

Pandya out of match against New Zealand due to injury तेथे त्याला उपचारासाठी इंजेक्शन देखील दिले जाणार आहे. इंजेक्शन दिल्यानंतर तो बरा होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. बीसीसीआयने इंग्लंडमधील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि त्यांचेही तेच मत होते. मात्र, तो पुढचा सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी आर. अश्विन किंवा मोहम्मद शमी याचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अश्विनला आतापर्यंत केवळ एका सामन्यात संधी मिळाली आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विकेट मिळाली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा