
बीड- गुंगी आणणारे औषधे आणि गोळ्या विकणारे रॅकेट बीडमध्ये सक्रिय असून याचा पर्दाफाश करण्यास बीड शहर पोलिसांना यश आले आहे. शहर पोलिसांच्या पथकाने ही औषधे विकणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून औषधाच्या 42 बॉटल्स आणि 3 हजार गोळ्या, दोन मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 1लाख 27 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. दरम्यान यापूर्वी शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अटक केली असून आता यातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा