ठाकरे, पवारांनी युवकांची माफी मागावी-फडणवीस

0

मुंबई : कंत्राटी भरतीची सुरुवात व त्याला मान्यता देणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यातील युवकांची माफी मागावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात कंत्राटी भरतीचं 100 टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचे, आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. कंत्राटी भरतीसाठी नियुक्त झालेल्या ९ कंपन्या या मागच्या सरकारच्या काळात नियुक्त झाल्या, असेही त्यांनी सांगितले. कंत्राटी भरतीवर उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादीने माफी मागावी नाहीतर आम्हला विरोधकांचे पाप जनतेसमोर उघड करावे लागेल, असा इशारा फडणवीसांनी दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा