
बुलढाणा BULDHANA – कंत्राटी भरतीसाठी महाराष्ट्रात पहिला निर्णय मार्च 2003 रोजी झाला. तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात सुरू झाली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 मध्ये जीआर काढून कंत्राटी भरती सुरू करण्यात आली. 2010 मध्ये अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला आणि परत त्यांनी 6 हजार कंत्राटी पदांसाठी जीआर काढले होते. मात्र, कंत्राटी भरतीच्या संदर्भात मविआ नेत्यांनी विद्यमान राज्यातील महायुती सरकारवर बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले आहे. ते सर्व जीआर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय जाहीर करून यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, माफी न मागितल्यामुळे त्यांच्या विरोधात खामगाव भाजप कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास आघाडीचे तत्कालीन राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले. सचिन देशमुख (बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाजपा) यांनी पुढाकार घेतला.