
मुंबई MUMBAI – पुण्याहून दिल्लीकडे निघालेल्या अक्सा एअरच्या विमानाचं अचानक इमरजन्सी लँडीग करावं लागलं. विमानातील प्रवाशाने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचं सांगितल्यावर विमान कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. विमानाचे मुंबईत इमरजन्सी लँडीग करण्यात आल्यावर तपासणी करण्यात आली. मात्र, कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही. (Emergency landing of Pune-New Delhi Flight) शुक्रवारी रात्री ही घटना घडली. Emergency landing of the plane due to a strange passenger!
पुण्याहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सुरुवातीला छातीत दुखत असल्याची तक्रार विमानातील क्रू मेंबर्सकडे केली होती. त्यामुळे विमान मुंबई लँड करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मुंबई विमानतळावर उतरताच त्या प्रवाशाने बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ माजली. तातडीने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. प्रवाशाच्या बॅगेची बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून झडती घेण्यात आली. तपासणीनंतर प्रवाशाच्या बॅगेत काहीच आढळले नाही.

विमानतळ पोलिसांनी सदर प्रवाशी आणि त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची चौकशी सुरू केल्यावर हा प्रवासी औषधांच्या प्रभावामुळे बरळत असल्याचे लक्षात आले.