
धाराशिव DHARSHIV – शारदीय नवरात्र महोत्सवात आज सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री.तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आर्शीर्वाद दिला म्हणून या दिवशी हा महाअलंकार घालण्यात येतो व ही अवतार पूजा मांडण्यात येते.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा