मेट्रो आणि शहर बससेवा एकमेकांना पूरक

0

सार्वजनिक वाहतूक प्रणाली बैठकीमध्ये महा मेट्रो, व्यवस्थापकीय संचालक आणि      मनपा आयुक्त दरम्यान चर्चा

नागपूर NAGPUR  : महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या पुढाकाराने मेट्रो भवन येथे मल्टी मॉडेल इंटिग्रेशनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये नागपूर महानगरपालिका आयुक्त यांना आमंत्रित करण्यात आले होते. मेट्रो व शहर बससेवेतील प्रवाशांची संख्या वाढविणे व सार्वजनिक वाहतूक सेवेत आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. NAGPUR METRO 

या बैठकीत व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर यांनी सांगितले कि, मेट्रो आणि आपली बस सार्वजनिक वाहतूक सेवा शहरात वाढवणे आणि नागरिकांमध्ये त्याबाबत महत्त्व पटवून देणे, जनजागृती करणे या दोन्ही सार्वजनिक वाहतूक सेवा एकमेकांना स्पर्धक न राहता एकमेकांना पूरक असाव्या. मेट्रोमुळे सिटी बसमधील प्रवाशांची संख्या निश्चितच वाढू लागली आहे, असे त्यांनी आज मेट्रो भवन येथे आयोजित चर्चे दरम्यान नमूद केले.

शहराच्या विविध भागात प्रवास करण्यासाठी मनपाने मेट्रो टर्मिनल स्थानकांवर लक्ष केंद्रित करावे, संपूर्ण शहरात सार्वजनिक वाहतुकीची व्याप्ती वाढावी यासाठी तुटीचे क्षेत्र ओळखून हिट मॅप तयार करावा,अश्या सूचना त्यांनी मनपाला दिल्या. महापालिका शाळांतील ज्या विद्यार्थ्यांना मेट्रो सेवा घ्यायची आहे, त्यांची गरज ओळखून व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून मेट्रो त्यांच्यासाठी पास सुविधेची व्यवस्था करू शकेल.

चर्चे दरम्यान व्यवस्थापकीय संचालकांनी आणि आयुक्त यांच्या दरम्यान झालेली चर्चा ही सकारात्मक होती. महामेट्रोच्या मालिमॉडेल इंटीग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांना मनपाच्या परिवहन विभागाशी योग्य समन्वय साधण्याचे निर्देश श्री. हार्डीकर यांनी दिले. जास्तीत जास्त परिवहन सेवेतील भागधारकांशी चर्चा करून सध्याच्या सेवेबाबत त्यांचे मत जाणून घ्यावे तसेच मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, ई-रिक्षा, कॉमन रिक्षा सेवा अशा इतर कोणत्या सेवांची आवश्यकता आहे आणि कोणत्या भागात प्रथम व महत्त्वाची सेवा योग्य आहे, याबाबत त्यांचे मत जाणून घ्यावे, असे निर्देश त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज पी, अतिरिक्त महापालिका आयुक्त आंचल गोयल, परिवहन व्यवस्थापक बागले, महामेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक आनंद कुमार, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, संदीप बापट, उपमहाव्यवस्थापक महेश मोरोणे, उपमहाव्यवस्थापक एस.जी राव उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा