
मुंबई-२०१६ च्या उरी येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेते, अभिनेत्री, गायक व इतर कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही बंदी उठविण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माहिरा खान, फवाद खान Mahira Khan, Fawad Khan यासारख्या कलाकारांना भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची परवानगी मिळणार आहे. Pakistani artists will be allowed to work
पाकिस्तानी कलाकारांवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. देशभक्त होण्यासाठी विदेशातील व विशेषतः शेजारी देशातील व्यक्तींशी शत्रूतापूर्ण व्यवहार करणे गरजेचे नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
फैज अनवर कुरेशी या सिनेकर्मीने ही याचिका दाखल करत बंदीची मागणी केली होती. आपल्या याचिकेत त्याने भारतीय सेलिब्रिटींना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. या निर्णयामुळे फवाद खान, अली जफर, माहिरा खान, सबा कमर अशा लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचा भारतीय सिनेमांमध्ये अभिनय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
