जे निकष लावले ते शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे – विजय वडेट्टीवार

0

नागपूर  NAGPUR – केंद्र सरकारने शेती उत्पादनाचे नवे हमीभाव जाहिर केले. मात्र,यात जे निकष लावले आहेत, ते शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. दीड पट उत्पन्नाचं गाजर दिलं होतं. मात्र, खायला काहीच मिळतं नाही अशी स्थिती आज असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. भाजपची नेतेमंडळी केवळ घोषणा करुन पाठ थोपटून घेतात मात्र, उत्पादन खर्च 3400 आहे आणि हमीभाव 4500 देत आहे. शेतकऱ्याला खत पाणी, नांगरणी, फवारणी, पकडून जवळपास 4500 खर्च येतो. त्यासाठी पाच हजार चारशे रुपये भाव देऊन केंद्र सरकारने शेतकऱ्याला न्याय द्यावा. वाढीव हमीभाव म्हणत 2014 पासून प्रतिवर्षी शंभर रुपये दराने फक्तं वाढ होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन विकल्या जात आहे. आणि आम्ही हमीभाव दीडपट देतोय, असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून शेतकऱ्याचा भ्रमनिरास केला जातोय. The norms that were imposed ruined the farmers – Vijay Vadettiwar 
10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन संदर्भात छेडले असता वडेट्टीवार म्हणाले, भाजप म्हणजे दुतोंडी साप आहे. यांना कुठलेही बुड नाही. सत्तेप्रमाणे भूमिका बदलणारा हा पक्ष आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशन किमान तीन चार आठवडे तरी चालवावे, अशी आमची मागणी राहील, नाहीतरी नागपूरच्याच भरवश्यावर राज्य चालतंय हे त्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा दिला.
भाजपचे आजचे आंदोलन आमच्याविरोधात नव्हे तर पश्चाताप आंदोलन असावे खरेतर त्यांनीच नाक घासून महाराष्ट्रातील तरुणाची माफी मागावी. भाजपला सरकारमध्ये येऊन दीड वर्ष झाली आहेत.आज आमच्यावर आरोप करत आहेत. दीड वर्ष झोपले होते का? असा सवाल
विजय वडेट्टीवार यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा