राजधानी दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के; ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेनं हादरला परीसर

0

गेल्या काही दिवसांपासून भारताची राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहे. रविवारी सकाळीही दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळची राजधानी काठमांडूपासून पश्चिमेला ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धाडिंग येथे होता, अशी माहिती नेपाळ राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. Earthquake shocks again in capital Delhi; The area shook with 6.1 Richter scale intensity

युरोपीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १३ किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. राजधानी दिल्लीसह बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. PDNA अहवालानुसार, नेपाळ हा जगातील ११ वा भूकंपप्रवण देश आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा