
बीड BEED– मराठा आरक्षणावर MARATHA ARAKSHAN टिका करणाऱ्या व काहीही बरळणाऱ्या नेत्यांविरोधात बीडच्या ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. बीड तालुक्यातील सौंदना गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम, छगन भुजबळ, Narayan Rane, Ramdas Kadam, Chhagan Bhujbal, सदावर्ते यांच्या पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सध्या आरक्षणाचा विषय चांगलाच पेटलेला असताना या नेत्यांकडून मराठा आरक्षणाविषयी वेगळ्यावेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. याचाच निषेध करत या ग्रामस्थांनी हा रोष व्यक्त केला. आंदोलनामध्ये गावातील महिलांनी देखील सहभाग नोंदवत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला आहे . या नेत्यांनी समस्त मराठा समाज बांधवांची माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.