
अमरावती AMRAWATI – नवरात्री NAVRATRI 2023 निमित्ताने आज अमरावतीत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी पदयात्रा केली. राणा दाम्पत्याने अनवानी पायाने पदयात्रा केली आहे. विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्याने ही पदयात्रा केली आहे. राणा दाम्पत्याच्या गंगा-सावित्री निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या अंबादेवी मंदिरा पर्यंत पदयात्रा होती दरम्यान राणा दाम्पत्याकडून अंबादेवीची महाआरती करण्यात आली. शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि शरद पवार यांनी NDA मध्ये सामील झाले पाहिजे असे साकडे राणा दाम्पत्याने अंबादेवीला घातल्याचे सांगितले