आंदोलनाची नौटंकी कशाला..?

0

NAGPUR देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोक-यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, तसेच या पापातील त्यांचे भागीदार Chief Minister Eknath Shinde and Ajit Pawar मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माफी मागायला सांगावी असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बहुदा खोटे बोलण्याचेच प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे भाजपा नेते सातत्याने खोटे बोलत असतात. कंत्राटी पद्धतीच्या नोकरी भरतीमध्येही देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण राज्यातील जनता विशेषत: तरुण मुले-मुली यांना भाजपाचा हा खोटारडेपणा समजतो. राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त असताना ही पदे भाजपा सरकार भरत नाही. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी परिक्षा, तलाठी भरती मधील घोटाळा, हे पाप भाजपाचेच आहे हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. काही तरुण मुले मुली दोन-तीन वर्षापासून केवळ नियुक्तीपत्र मिळाले नाहीत म्हणून नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाहीत. एमपीएससी चा सावळा गोंधळ सुरुच आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार सारखी अत्यंत जबाबदार व महत्वाची पदे एमपीएससीकडून न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला होता. पण खोटारडे फडणवीस स्वत:चे पाप दुस-यावर टाकून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

 

 

हिवाळी अधिवेशन संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस आता दुसरे मुख्यमंत्री आहेत. ते विदर्भातले अन विशेष म्हणजे नागपूरचे आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, नागपूर करारा प्रमाणे हे अधिवेशन दोन महिने चाललेच पहिजे. आजवर
सगळ्या शेतकऱ्यांना उध्वस्त करायचे काम भाजपने केले आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ असताना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक शब्दही काढला गेला नाही असा आरोप पटोले यांनी केला.काँगेसने ही भूमिका सुरुवातीला मांडली होती. सामान्य माणसांनी आमचे मूल बर्बाद होत आहे, अशी व्यथा मांडली तेव्हां सरकारला जाग आली. आजही सरकारला आम्ही वेळ देतोय. महाराष्ट्रतील तरुणाई संपवायला निघालेल्यामध्ये ज्याचे कोणाचे लागेबांधे असतील त्यांना समोर आणावे. प्रसंगी सरकारला काँग्रेसची मदत लागल्यास आम्ही मदत करु. ललित पाटलांनी स्वतः सांगितलं, मला राज्यकर्त्यांनी पळवून लावलं.तो मैत्रिणी सोबत एन्जॉय करतोय, अश्या माणसाला कोणत्या आधारावर सगळी सुविधा पुरविण्यात येते? रोगी नसताना उपचारासाठी भरती कसं करण्यात आल.या सगळ्यात जो जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी

यांच्या पायाखालची माती खचल्याने ते चिडलेले लोक आहेत.कालची फडणवीसांची खेळी समजून घेण्यासारखी आहे. ही खेळी त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आजित पवार, एकनाथ शिंदेंसोबत खेळली गेली आहे. खरेतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी हे सत्तेत होते. त्यामुळे कालचा टोला एकनाथ शिंदे व अजित पवारांना होता का? असा प्रश्न निर्माण होतोय. आता दीड वर्ष तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला आता जाग आली का? नागपूरला अधिवेशन होईपर्यंत काय काय खेळ होतात ते बघायचं असा इशाराही दिला.,राज्य मंत्रिमंडळात सगळे सामुहिक निर्णय असतात. पण तहसीलदारापर्यंत पदे भरावी असे कुठेही नाही. आऊटसोर्स या सरकारने आणलेय, त्यामुळे शासनाची साईट खुलीआहे ज्यांना शंका आहे त्यांनी ती तपासावी,तरुणांना भजे, पकोडे तळणारे जर हे समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. आरक्षण प्रकरणी ज्या भाजपने आग लावली, त्यांनेच हा निर्णय द्यावा,सत्तेसाठी धनगर समाज, गोवारी, मराठा समाजाला सांगितल की 24 तासांत आम्ही आरक्षण देणारं आता त्यांनीच द्यावे यावर नाना पटोले यांनी भर दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा