
गडचिरोली : आज रविवार दिनांक 22/ 10/2023 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील गुरवळा याठिकाणी महाराष्ट्र कलावंत कलावंत न्याय हक्क समिती ह्या राज्यव्यापी कलावंत संघटनेची महत्वपूर्ण बैठक विदर्भ विभाग महिला प्रमुख सौ.सारिकाताई उराडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कलावंतांचे प्रश्न व समस्या आजपर्यंत कुणीही सोडवण्यासाठी पुढे आले नाही म्हणून जिल्ह्यातील हजारो कलावंत हे शासकीय मानधनापासून वंचित आहेत याकरिता लवकरच कलावंत एकता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे यानिमित्ताने जिल्ह्यातील तळागाळातील उपेक्षित / वंचित / दुर्लक्षित कलावंतांचे एकत्रिकरण करणार आहोत यामाध्यमातुन कलावंतांचे प्रश्न व समस्या सुटण्यासाठी मदत होवु शकते असे विचार सौ.सारिकाताई उराडे यांनी बैठकीत व्यक्त केले.
तसेच ह्या बैठकीत गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गायक विजय शेंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली…तर.. पुरुषोत्तम रामटेके कार्याध्यक्ष तर तुळशीराम उंदीरवाडे यांची सर्वानुमते उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तर बैठकीचे सुत्रसंचालन चंद्रपूर जिल्हा संघटक तुकाराम जी. कोंडेकर यांनी केले.गडचिरोली जिल्ह्यात कलावंतांची बैठक हि प्रथमच आयोजित करण्यात आली म्हणून कलावंतांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

याप्रसंगी बैठकीसाठी आबाजी भोयर,सुधाकर डंबारे, कलावती मीतरवार,मंगला गडगीलवार, केशव पांगरे, विलास रणबीर, सुधीर देशमुख, कैलास तुरुकमारे, शिवाजी रणबीर, माणिक क्षुंगारे, भिमराव रामटेके, मधुकर कोंडेकर, हुसेन मौसिन शेख, धर्मदास भोयर, आणि शेकडो कलावंत उपस्थित होते. या बैठकीची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.