संजय राऊतांना न्यायालयात हजर होण्याचे निर्देश का?

0

नाशिक : राज्याचे मंत्री दादा भुसे DADA BHUSE यांनी ठाकरे गटाचे खासदार SANJAY RAUT संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता व याप्रकरणी राऊत यांना आज मालेगाव न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या मुखपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात दादा भुसे यांच्यावर आरोप होता. त्यावरुन भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. यासंदर्भात न्यायालयाने नोटीस जारी करून राऊत यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ते स्वतः हजर होतात की वकीलांमार्फत न्यायालयात बाजू मांडतात, हे स्पष्ट झालेले नाही.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा