
तवांग: विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीन सीमेवर (India-China Border) शस्त्रपूजन पार पाडले. यावेळी राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात सैन्यदलासोबत (Defence Minister Rajnath Singh) विजयादशमी साजरी केली.
सध्या भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सामान्य नाही. दोन्ही बाजुंनी सैन्यदल सीमेवर तैनात आहेत. या पार्श्वभूमीवर चीनला थेट संदेश देण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्र राजनाथ सिंह यांनी तवांग गाठत शस्त्रपूजन साधले. शस्त्रपूजनाचा व्हिडीओ त्यांनी एक्सवर शेअर केला आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेता त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो, असे संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले