
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना मंत्री दादा भुसे यांनी अवमान नोटीस बजावली आहे. नाशिकच्या ड्रग प्रकरणात अंधारे यांनी भुसे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनी वकीलामार्फत त्यांना नोटीस बजावली आहे.
नाशिकच्या ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात दादा भुसे आणि शंभुराज देसाई या दोन मंत्र्यांवर आरोप लावले आहेत. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. खासदार संजय राऊत यांनीही दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते. भुसे यांनी हे आरोप धुडकावून लावत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते. तर दुसऱ्या एका प्रकरणात संजय राऊत यांनी बदनामी केली म्हणून दादा भुसे यांनी मालेगाव कोर्टात खटला दाखल केला होता. त्या संदर्भात कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली होती. आता ड्रग्ज प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेतल्यामुळे सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.