मुंबईतील मेळाव्यांमध्ये फुटणार राजकीय आरोपांचे फटाके

0

मुंबई : दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे स्वतंत्र मेळावे भरणार आहेत. अनुक्रमे शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन साधले जाणार असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके देखील फुटणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर कशाप्रकारे शरसंधान करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागेलेले आहे.
गेल्यावर्षी शिवसेनेत उभी फुट पडल्यावर दसऱ्याच्या दोन स्वतंत्र मेळाव्यांची सुरुवात झाली. यंदाच्या भाषणात उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करतील, असे संकेत आहेत. आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याचा टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला होता. शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व! असा संदेश त्यातून देण्यात आलाय. मेळाव्यास प्रचंड गर्दी जमविण्यासाठी दोन्ही गटांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी राज्यभरातून दोन्ही गटांचे कार्यकर्ते मेळाव्यांना हजेरी लावणार आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा