कातलाबोडी ग्रामपंचायतीचा कारभार महिला चालवणार!

0

नागपूर NAGPUR  – या पुरुष प्रधान देशात एका ग्राम पंचायतीत पूर्णपणे महिलांची सत्ता स्थापित होण्याचा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडून आला आहे.

हे आदर्शवत उदाहरण नागपूर जिल्ह्यातील काटोल KATOL तालुक्यातील कातलाबोडी या गावातील आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना सुरुवात झाली आहे. आज निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. मात्र, कुठल्याही पक्षाने विरोधात अर्ज सादर न केल्याने, सर्वानुमते आठ महिलांचे पॅनल बिनविरोध विजयी झाले आहे. हेच संपूर्ण पॅनल राष्ट्रवादी काँगेस पक्ष शरद पवार गटाचे असल्यामुळे या आठही महिलांचा माजी गृहमंत्री  ANIL DESHMUKH अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सम्मान करण्यात आला. या महिलांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना पुढीलप्रमाणे व्यक्त केल्यात….. पुरुष मंडळांनी यंदा कातलाबोडी गावच्या विकासाची सूत्रे महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गावच्या पुरुषवर्गाच्या सहकार्याने या महिलांचं पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणांगणात उतरलं.

आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, कुठल्याही पक्षाने विरोधात अर्ज सादर न केल्याने या महिलांचं पॅनल बिनविरोध निवडून आलं. पुरुष वर्गाससोबतच गावच्या नागरिकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला, तो सार्थ करून दाखवत आम्ही महिला गावचा उत्तम विकास करून दाखवू… अशी प्रतिक्रिया कातलाबोडी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ अर्चनाताई ललीत खोब्रागडे यांनी व्यक्त केली. Ms. Shilpa Rahul Irpachi, Alka Naresh Kokde, Ms. Pallavi Ishwar Ramgoode, Ms. Ashabai Modharak Valke, Karisma Rahul Bhad, Sanjana Sudhakar Khandate and Surekha Ram Markame.  तर, सौ शिल्पा राहुल इरपाची, अल्का नरेश कोकडे , सौ पल्लवी ईश्वर रामगूडे , आशाबाई सुधारक वलके ,करिश्मा राहुल भड , संजना सुधारक खंडाते आणि सुरेखा राम मरकामे यांनी ग्रामपंचायत पदाची सूत्रे सांभाळली , एकंदरीतच महिलांची पूर्ण सत्ता असलेलं कातलाबोडी हे एकमवे गाव पूर्ण देशासमोर आदर्श उदाहरण म्हणून पुढ आलं आहे

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा