
अमरावती AMRAWATI –शहरातील व्हीएमव्ही परिसराच्या मणिपूर लेआऊट मध्ये BIBAT बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही दिवसा अगोदर याच परिसरातील पाठ्यपुस्तक विभागात बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. आज सकाळी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांनी बघितल्याने मोठी गर्दी या परिसरात नागरिकांनी केली आहे. माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. बिबट्याला जेर बंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही.वनविभागाकडून बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी या परिसरातले नागरिक करत आहेत.