उद्धव ठाकरेंना विस्मृतीचा आजार

0

 

चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला!

मुंबई MUMBAI -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  SHRAD PAWAR शरद पवार यांच्या रुग्णालयात गेल्यानं उद्धव ठाकरे यांना विस्मृतीचा आजार जडला आहे. उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे इंडिया आघाडीच्या प्रवक्त्याचे भाषण होते, या शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर तोप डागली. (BJP State President Chandrashekhar Bawankule)
हिंदुंवर टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनवर ते का बोलत नाहीत असाही प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला.

भाजपा हा विघ्नसंतोषी पक्ष असल्याची टीका ठाकरेंनी काल केली होती. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मुद्देच उरलेले नाहीत. त्यामुळे ते लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांना दिशा देता आली नाही की दिशाभूल करायची हेच त्यांच्या भाषणातून दिसते. अडीच वर्षे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा विकास साधला नाही. त्यामुळे विकासाचा मुद्दाही त्यांच्याकडे नाही. विकासाचा अजेंडा संपतो आणि व्हिजनलेस व्यक्ती राजकारणात असतो तेव्हा दिशाभूल करण्याचे काम करतो. जनसंघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता वगैरे वगैरे ते बोलतात. इतके दिवस त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष एकाच विचारधारेवर काम करत होता. मात्र उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यामुळे त्यांना विस्मृतीचा आजार जडला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा