फडणवीसांची मध्यस्थी, नीलेश राणेंचा निर्णय मागे

0

मुंबई MUMBAI – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे NILESH RANE   यांनी अखेर निवृत्तीची घोषणा मागे घेतली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली व त्यानंतर हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यानंतर फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर नीलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय रद्द केला असल्याची माहिती आहे.

कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यामुळे नीलेश राणे नाराज होते. मात्र, आता त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. सिंधुदुर्गात निलेश राणे यांच्या नेतृत्वात पक्षाचा झंझावात कायम राहील, असे सांगतानाच निलेश राणे यांनी जो मुद्दा मांडला त्याची दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निलेश राणे यांनीही आपला राजीनामा मागे घेत पक्षात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीनंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे मीडियासमोर आले. चव्हाण यांनीच मीडियाशी संवाद साधून सर्व गोष्टींचा उलगडा केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा