फक्त टोमणे मारून काही होत नाही; प्रफुल्ल पटेल

0

गोंदिया – फक्त विरोधात बसून किंवा इतरांना टोमणे मारून काहीही होत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. निलेश राणे यांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी भविष्यात काय करायचे याचा विचार करावा असे सांगितले..Just taunting doesn’t do anything; Praful Patel 
संजय राऊत  SANJAY RAUT काय बोलतात? त्यावर बोलणे हे काही महत्त्वाचे नाही.

रोहित पवार  ROHIT PAWAR यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरावं महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत? महाराष्ट्राच्या अडचणी काय आहेत? याची जाणीव त्यांना व्हावी आणि त्यासाठी सरकारमध्ये असणे किती महत्त्वाचे आहे, फक्त विरोधात बसून टोमणे मारल्याने काही होत नाही. जरांगे पाटील उपोषण संदर्भात पटेल म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. मात्र, आरक्षण असे मिळावं की, जे टिकेल आणि दीर्घकाळ चालेल.यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे.सध्या कुणबी समाजाचं निजाम काळातील पुरावे असणाऱ्यांना मराठा समाजात समावेश करण्यात आला आहे. मराठा समाजाने धीर आणि संयम दाखवावा असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा