आंतरशालेय जोगवा/गोंधळ समूहगान स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल महाल प्रथम

0

नागपूर, 25 ऑक्‍टोबर
श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथील सुंदराबाई साने सभागृहात झालेल्‍या नवरात्रीय शारदोत्सवात स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारक मंडळ व बालकला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार शिक्षकांसाठी कै. लीलाताई फडणवीस स्मृती आंतरशालेय समूह गान जोगवा/गोंधळ स्पर्धा घेण्‍यात आली. यात एकूण दहा शाळांच्या शिक्षक चम़ूनी सहभाग घेतला. सीमा दामले व रसिका बावडेकर यांनी परीक्षक म्‍हणून काम पाहिले. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला तर इसेन्स हायस्कूलने द्वितीय व हडस हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. शाहूज गार्डन, विभाताई गांधी प्राथमिक शाळेने उत्‍तेजनार्थ पार‍ितोषिक पटकावले.
पार‍ितोषिक वितरण कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस होते. यावेळी अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस, शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे, उपमुख्याध्यापक सुबोध आष्टीकर, पर्यवेक्षक राहुल बोबडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा डोमके डोमके उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उर्वशी डावरे यांनी केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा