प्राथमिक शिक्षकांना आयुष्यमान-भारत जन आरोग्य नोंदणी नकोच !

0

नागपूर NAGPUR – आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंर्तगत E-KYC करणे व आयुष्यमान कार्ड तयार करुन घेण्याकरीता कर्मचा-यांनी लाभार्थ्यांचे घरोघरी जाउन लक्षांक पूर्ण करणेबाबत लेखी सूचनानंतर शिक्षकात तीव्र नारोजी आहे. अमरावती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी,सर्व पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांच्या मार्फत सूचना दिल्या पण हे काम अशैक्षणिक असुन शिक्षण विभागाचा याच्याशी कोणताही सबंध नाही यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते म्हणुन हे काम प्राथमिक शिक्षकांना देऊ नये अश्या प्रकारचे निवेदन सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा अमरावती यांनी आज प्रशासनाला दिले आहे.आंदोलन झाल्यास शासकीय कामे खोळंबण्याची शक्यता असल्याचे
निवेदन आज शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत,जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे,राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शैलेन्द दहातोंडे,उमेश चुनकीकर,प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र मेटे,राजकुमार खर्चान,उर्दू शिक्षक संघटनेचे वसिम फरहत,जावेद जोहर,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे संतोष डोंगरे,अ.भा.शिक्षक संघाचे प्रविण शेंदरे,प्रफुल्ल ढोरे,गजानन निर्नळ,राजेश खोबरखेडे,शिक्षक सेनेचे सुधीर उमाळे,जुनी पेन्शन संघटनेचे गौरव काळे,म.रा.शिक्षक संघाचे सुनिल कुकडे,संजय बागडे,अपंग संघटनेचे राजु दिक्षित,किशोर मालोकार,उर्दू संघटनेचे इमरान खान पठान,शिक्षक समितीचे अनिस शेख,संतोष राऊत,सतीश खंडारे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी दिले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा