समूह लोकगीत गायन स्पर्धा 29 ऑक्टोबरला

0

 

(nagpur)नागपूर, 26 ऑक्टोबर

विदर्भ साहित्य संघातर्फे ‘जागर लोकसंस्कृतीचा’ या समूह लोकगीत गायन स्पर्धेचे रविवार, 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. कोजागिरीनिमित्त लोकसंस्कृतीचा जागर करण्यासाठी आयोजित या स्पर्धेचे झाशी राणी चौक, सीताबर्डी स्थित सांस्कृतिक संकुलातील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात होणार आहे. यात स्पर्धकांना गोंधळ, गवळण, शेतकरी गीत, भारूड, भुलाबाईची गाणी अशा विविध प्रकारांतील लोकगीत सादर करणार आहे.

या स्पर्धेला रसिकांनीही उपस्थित राहून या लोकगीतांचा आनंद घेण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीने केले आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा