देवरीत ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण

0

 

धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते देवरीत ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण

(Gondia)गोंदिया–  (District Guardian Minister and State Food and Supplies Minister Dharma Rao Baba Atram)जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सध्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील अतिदूर्गम नक्षलग्रस्त तालुका देवरी येथे आधुनिक सुविधांद्वारे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते पार पडला. विशेष म्हणजे या ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन स्थानिक आमदार सहसराम कोराटे यांनी यापूर्वी स्वतः केलेलं होतं. परंतु आता शासकीय नियमानुसार या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री धर्मरावबाब अत्राम यांच्या हस्ते आणि (Lok Sabha MP Ashok Nete)लोकसभेचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडला.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा