कोकणातील मराठे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत-रामदास कदम

0

(Chiplun)चिपळूण : कोकणातील मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही, अशी भूमिका माजी मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम (Shiv Sena Leader Ramdas Kadam) यांनीही मांडली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही, अशी भूमिका मांडली होती. आता त्यात कदम यांचीही भर पडली आहे.

रामदास कदम म्हणाले की, आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास थोडा कच्चा आहे. विदर्भ, मराठवाडा येथील मराठे कुणबी प्रमाणपत्र घेतील, पण कोकणात कुणबी मराठ्यांमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत, हे जरांगे यांना माहिती नाही. त्यामुळे कोकणातील मराठे असे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. जरांगे यांच्या उपोषणामागे काही राजकीय शक्तींचा हात आहे, असा आरोपही कदम यांनी केला. मराठा समाज किती मागासलेला आहे हे दाखवून द्या, असे न्यायालयाने म्हटले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा