
(Mumbai)मुंबई– शिवसेनेत बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार याप्रकरणी आज (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर महत्त्वाची सुनावणी होणार असून या सुनावणीत ते सर्वोच्च न्यायालयाने सूचित केल्याप्रमाणे नव्या वेळापत्रकावर काही निर्णय घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नार्वेकर यांनी मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात देण्यात आलेली कागदपत्रे आपल्यापुढे सादर करा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यासाठी त्यांनी काल बुधवारची मुदत दिली होती. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी सादर केलेल्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली असल्याने ते आता नव्या वेळापत्रकाबात काय भूमिका घेतात, याचे संकेत आज मिळू शकतात. या मुद्यावर ३० ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
