‘एकच नारा, कायम करा’ आंदोलन

0

 

(Buldhana) बुलढाणा-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजपासून त्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेत आज या कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकच नारा, कायम करा अशा घोषणा देत काम बंद आंदोलन केले. मागण्यांची 30 ऑक्टोबरपर्यंत दखल न घेतल्यास आझाद मैदानावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा