पंतप्रधान मोदींनी घेतले साईदर्शन

0

(Shirdi)शिरडी– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी साई मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पाद्यपूजेसह साईदर्शन घेत आरतीही केली. मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी (Governor Ramesh Bais)राज्यपाल रमेश बैस यांच्यासह (Chief Minister Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Ajit Pawar)अजित पवार उपस्थित होते.

अहमदनगरच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनेक विकास योजनांचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय मोदी यांची जाहीरसभाही होणार आहे. या जाहीरसभेसाठी आसपासच्या गावातून हजारोंच्या संख्येने लोक सभेसाठी पोहोचत आहेत. कडेकोट बंदोबस्तात पोलीस प्रत्येकाला तपासूनच आतमध्ये सोडण्यात येत आहेत. मोदी यांच्या हस्ते निळवंडे कालव्याचे लोकार्पणही होणार आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा