स्त्री पात्रांनी सादर केली समर्थनगरात ‘रामलीला’

0

(Nagpur)नागपूर – सर्वसाधारणपणे रामलीला म्हटले की बहुतांशी पुरुष पात्र असतात मात्र यशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग १६ तर्फे विजयादशमी (दसरा) निमित्त मंगळवारी ‘रावण दहन’ हा धार्मिक उत्सव कार्यक्रम पूर्व समर्थनगर मनपा प्रांगण येथे संपन्न झाला. यावेळी स्त्री पात्रांनी सादर केलेली अनोखी रामलीला लक्षवेधी ठरली. खेमचंद बिनावार यांनी रावणाची ४० फूट उंचीची प्रतिमा तयार केली होती. या कार्यक्रमाचे हे २६ वे वर्ष होते. धोंडीबाजी परसराम करवटकर यांनी सुंदर फटाका शो आयोजित केला. या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन दिलीप पनकुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाग्यश्री चिटणीस निर्मित “पुरुषोत्तम रामकथा”रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पुरुषोत्तम राम, लक्ष्मण, हनुमान, रावण, जटायू व रामलीलातील इतरही सर्व पात्रांचे सादरीकरण स्त्रियांनी करून एका नाविन्यपूर्ण रामकथा नाटिकाचे अनोखे दर्शन घडविले. पद्मश्री आगूस इंद्रा उडियाना (बाली), इंडोनेशिया यांची प्रमुख उपस्थिती हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. कलादिग्दर्शक संजय पेंडसे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, आमदार सागर मेघे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, सुनील रायसोनी, राजू अग्रवाल, मिकी अरोरा, देवीलाल जयस्वाल, प्रदेश सेवादल प्रदेशाध्यक्ष जानबा मस्के, प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तात्यासाहेब मते, मा. संजय खटी, विलास पोटफोडे, सोपानराव शिरसाट, प्रा. बबलू चव्हाण, प्रमोद वानकर, मच्छिंद्र आवळे, पिंकी शर्मा, विजय मसराम इत्यादींनी परिश्रम घेतले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा