“पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?”..पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

0

(Ahmednagar)अहमदनगर : शरद पवार हे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना त्यांच्या एमएसपीचे पैसे मिळत नव्हते. वैयक्तिकरित्या त्यांचा सन्मान होत होता. पण, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीरसभेत उपस्थित केला.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही यावेळी उपस्थित होते. शिरडीजवळील काकडी गावात आयोजित जाहीरसभेत बोलताना मोदी यांनी आज शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषीमंत्री राहिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी रुपये एमएसपीवर धान्य खरेदी केले. आम्ही त्याच कालावधीत साडेतेरा लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केले, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi on Sharad Pawar)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नेत्यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री

दरम्यान, मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते असा खोचक टोला (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. शिर्डी येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना शिंदे यांनी ही टीका केली आहे. पंतप्रधान मोदी ज्या कामाचे उद्घाटन करतात, तो प्रकल्प वायू वेगाने पुढे जाऊन पूर्ण होत असतो. अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आहे. त्यांच्या हाताला यशाचा परीस असून, हात लावताच सोनं होते. त्यामुळे महाराष्ट्रातील भूमिपूजनासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी बोलावत असतो. पण मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखते, पण त्यांच्याकडे आम्हाला काही बघायचं नाही. अशा पोट दुखणाऱ्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी विनामूल्य उपचार देण्यात येतात, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा