
गोंदिया GONDIYA – गोंदिया जिल्ह्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक हे आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये आरोग्य विषयक माहिती आणि आरोग्य संबंधित अडीअडचणी, ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील आणि अतिदुर्गम भागातील आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी आशासेविका आणि गटप्रवर्तक ही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना अपुरे मानधन मिळत असल्यामुळे आशा सेविका आणि गटप्रवर्तक हे संपावर गेले आहेत. आशा सेविका आणि गटप्रवर्तक आपल्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर आंदोलन उभारले असून आशा सेविकांना 18 हजार रुपये तसेच गटप्रवर्तन यांना 22 हजार रुपये मानधन देण्यात यावे आणि या सर्वांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन त्यांनी सुरू केले आहे. दिवाळीला एक महिन्याचा बोनस देण्याची मागणी सुद्धा या अशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी केली आहे. आशा सेविका यांनी संप पुकरल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यविषयक बाबी फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.