
नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचा RSS इतिहास लवकरच वेब सिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर मांडला जाणार आहे. वेब सिरीजच्या माध्यमातून संघाचा ९८ वर्षांचा इतिहास उलगडला जाणार असून विजयादशमीच्या दिवशी ‘वन नेशन’ नावाच्या या वेब सीरिजचे पहिले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. संघाच्या स्थापनेला ९८ वर्षे उलटली असून २०२५ मध्ये संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे. या वर्षात ही वेब सिरीज ओटीची प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या वेब सिरीजच्या दिग्दर्शनासाठी तब्बल सहा दिग्दर्शक एकत्र येणार आहेत. त्यात प्रियदर्शन, विवेक अग्निहोत्री, डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी, जॉन मॅथ्यू माथन, मंजू बोरा आणि संजय पूरण सिंग चौहान यांचा सामावेश आहे.