“..तर जयंत पाटीलही आमच्यासोबत असते”-मुश्रीफ

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते जयंत पाटील हे देखील आमच्यासोबत आले असते. पण, एका घटनेमुळे त्यांनी भूमिका बदलली, अन्यथा त्यांनी देखील आमच्याबरोबर शपथ घेतली असती, असा गौप्यस्फोट  AJIT PAWAR  अजित पवार गटातील नेते HASAN MUSHRIF हसन मुश्रीफ यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्याच्याशी इमान ठेवणे आणि त्यांच्यासाठी जीवाचे रान करणे हा माझा स्वभाव आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

मुश्रीफ म्हणाले की, जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतीमूल्ये पाळणारा माणूस आहे.
दरम्यान, दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तर त्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील यांनी मोदी यांचा पवारांवरील जुना व्हिडोओ पोस्ट केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा