वाहिन्यांचा आगाऊपणा भाजपा मीडियाचा आततायीपणा

0

 हेमंत जोशी

वास्तविक रावसाहेब दानवे Raosaheb Danve  या वयात देखील  BJP भाजपाचे कृष्ण कन्हैय्या म्हणून ओळखले जातात तरीही याच रावसाहेबांनी ते प्रदेशाध्यक्ष असतांना कार्यालयातल्या नटण्या मुरडणार्या त्या सोशल मीडियावर कबजा करून लबाडीने घबाड मिळविणाऱ्या सुंदरीला बऱ्यापैकी वठणीवर आणून तिची मस्त नाकाबंदी केली होती मात्र बावनकुळेंच्या कारकिर्दीत पुन्हा या रुपगर्वितेला अचानक डिमांड आल्याने भाजपा सोशल मीडियाच्या बाबतीत पुन्हा इतर पक्षांच्या तुलनेत रसातळाला जाते कि काय अशी शंका भाजपा कार्यालयात ठाण मांडून बसणारे व्यक्त करू लागले आहेत किंबहुना तिच्या पुन्हा वाढलेल्या प्रस्थावर कदाचित असूयेतून कुरबुरी सुरु झालेल्या असाव्यात.

27 ऑकटोबर रोजी, मी पुन्हा येईन,  MI PUNHA YEIL या ट्विटवर माजलेला गोंधळ आणि झालेली बदनामी तसेच फुकाची बिनकामाची चर्चा भाजपा सोशल मीडियाच्या मूर्ख भूमिकेतून घडली कि फडणवीसांना डिवचण्याचा तो दुष्ट प्रयत्न होता, मला एकदा नेमके उत्तर मिळाले कि झारीतल्या शुक्राचार्यांना नागडे करता येईल पण आज तरी विरोधकांनी, फडणवीसांचे स्वतःचे हे कारस्थान आहे असे पसरवून नेहमीप्रमाणे शिंदे आणि फडणवीसांमध्ये गैरसमज पसरविण्याचे थोडक्यात न लागलेल्या आगीत तेल ओतण्याचे दुष्ट काम सुरु केले आहे, कदाचित या अशा अफवा कंड्या पिकविण्यात पसरविण्यात भाजपामधले काही असंतुष्ट आत्मे असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. मी पुन्हा येईन, हे ट्विट भाजपच्या हँडलवर सुमारे दोन तास असणे, भाजपाची आयटी सेल एवढी तगडी असतांना त्यांच्याकडून जेव्हा अशी चूक घडते त्यावर सर्वाधिक बदनामी फडणवीसांच्या वाट्याला येते आली म्हणून हा नेमका कोणाचा आगाऊपणा कि हलगर्जीपणा नेमका शोध नेत्यांनी घ्यावा. केवळ या एका ट्विटमुळे उभ्या महायुतीमध्ये अचानक पसरलेली अस्वस्थता, विरोधकांना नेमके जे हवे असते तेच भाजपा सोशल मीडियाने घडवून आणले….

या दिवसात मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या कानाकोपर्यात पेटलेला असतांना विशेषतः राज्यातल्या सर्वपक्षीय मराठा मंडळींचा आवडता मुख्यमंत्री नेता एकनाथ शिंदे असतांना त्यांना हटवून त्याजागी अनेकांच्या असूयेचा विषय म्हणजे ब्राम्हण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणे, स्वतः फडणवीस देखील जसे मुख्यमंत्री होण्यास ठाम नकार देतील नेमकी तीच भूमिका त्यांच्या पक्ष श्रेष्ठींची आहे असेल यात तिळमात्र शंका नाही, उचललेली जीभ लावली टाळूला उक्तीनुसार भाजपच्या चुकून कि मुद्दाम करण्यात आलेल्या ट्विटवर विविध मराठी वाहिन्यांनी घातलेला धुडगूस मनाला मनापासून किळस आणणारा आणि वाहिन्या कशा दिशाहीन व दर्जाहीन भूमिका घेऊ शकतात त्यावर हे ज्वलंत व उत्तम उदाहरण ठरावे. अद्याप पात्र अपात्रतेचा निर्णय गुलदस्त्यात आहे, किमान पुढले चार महिने त्यावर नेमके उत्तर मिळेल असे वाटत नाही म्हणजे शिंदे सरकार स्थिर असतांना मराठा मुख्यमंत्र्याला हटवून फडणवीसांना मुख्यमंत्रीपद, भाजप श्रेष्ठींना तुम्ही मूर्खओंके सरदार समजलात कि काय ? अत्यंत महत्वपूर्ण निवडणुकांच्या तोंडावर भाजपा श्रेष्ठी का म्हणून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतील. धरणे आंदोलने आणि या पद्धतीच्या अफवा, एकाचवेळी विविध कटकटींना डावपेचांना यशस्वीपणे सामोरे जाणार्या फडणवीसांचे करावे तेवढे कौतुक कमी…

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा