उद्योगपती अंबानींना पुन्हा मिळाली धमकी

0

मुंबई MUMBAI  -उद्योगपती मुकेश अंबानी यांना ईमेलवर जीवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांना २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असून देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून त्यांना लक्ष्य केले जाईल, असा इशाराही ईमेलमध्ये देण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी हा मेल आल्याचे सांगण्यात आले. (Industrialist Mukesh Ambani)
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ईमेल पाठवला आहे. या प्रकरणी मुंबईच्या गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर असून त्याच्यामार्फत लक्ष्य केले जाईल, असा इशारा त्यात देण्यात आला आहे. यापूर्वीही अंबानी यांना अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा