गावागावात आमरण उपोषण करा- मनोज जरांगे

0

जालना JALNA  : मराठा आरक्षणासाठी उपोषणावर असलेले मनोज जरांगे यांनी आज आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. (Maratha Reservation Issue)
यादरम्यान कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारने आता गांभीर्याने आंदोलनाची दखल घ्यावी व आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या आंदोलनाचीही सरकारने दोन दिवसांत दखल न घेतल्यास ३१ ऑक्टोबरला आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करू, असे त्यांनी जाहीर केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा