
नागपूर NAGPUR – मराठा आरक्षण MARATHA ARAKSHAN न मिळण्यास राज्य सरकार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Maratha Reservation Issue) अभ्यास न करता त्यांनी आरक्षणाचे आश्वासन कसं दिलं? तसंच मनोज जरांगेंनी 40 दिवस विश्वास का ठेवला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, या प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारचा नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, पूर्वी देखील राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत चर्चा करुन निर्णय घेतला नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास नकार देणे म्हणजे आता राज्य पूर्ण जबाबदारी आहे. आश्वासन पूर्ण होण्याची वेळ निघून गेली आहे व सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे. सध्या राज्यातील सर्व परिस्थितीला जबाबदार हे राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. सरकारची ऐपतच नाही तर खुर्चीवर बसून काय होणार आहे, हे आता सिद्ध झाले आहे.
