अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हालाही वाटतं – धर्मरावबाबा आत्राम

0

 

नागपूर NAGPUR  काल भाजपच्या ट्विटरवर मी पुन्हा येईल… हा व्हिडिओ आला होता. पण तो आता डिलिट झाला म्हणून त्यावर बोलण योग्य नाही. पण अजित पवार मुख्यमंत्री होतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही कामाला देखील लागलो आहोत असे विधान पुन्हा एकदा NCP राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.
आत्राम म्हणाले, मी विदर्भात आणि अजित पवार राज्यात फिरून जास्तीत जास्त जागा निवडून आणणार आहे.
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे काही ठरल नाही. पण महायुतीमध्ये असल्याने त्यावर आता जास्त बोलणार नाही. अजित पवार सोमवारी यवतमाळमध्ये येत आहेत. पक्षाला कार्यक्रम देण्यात येणार आहे. अजित पवार स्वतः विदर्भात दौरा करणार आहेत. अर्थातच तिन्ही पक्षाचे नेते बसून मुख्यमंत्री कोण? हे ठरवतील. अजित पवारांचा प्रशासनावर दबाव आहे, लोकांना देखील तेच वाटते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत.तीन सहकारी असल्याने तिन्ही पक्षांना वाटते आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यात वाईट काहीच नाही. घड्याळमध्ये किंवा बॅनरमध्ये कुठेही अजित पवारांचां फोटो लावला तर हरकत काय? यशवंतराव चव्हाण हे अजित पवारांचे गुरू आणि आमचेही गुरू आहेत. सणासुदीच्या दिवसात भेसळ नको म्हणून आमची यंत्रणा सज्ज आहे. हल्दीरामसारख्या मोठ्या कंपनीवर आम्ही कारवाई केली. भेसळ बंद व्हावी हा आमचा उद्देश आहे. दिवाळीत मिठाईमध्ये भेसळ होऊ नये. यासाठी आम्ही 4, 5 दिवसात मोठी कारवाई करू असे संकेत धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा