एर्नाकुलम साखळी बॉम्बस्फोटाने हादरले, एक ठार, ३० हून अधिक जखमी

0

* देशभरातील प्रमुख शहरांत हाय अलर्ट* केंद्र सरकारने पाठवली एनएसजी, एनआयएची पथके

एर्नाकुलम / नवी दिल्ली NEWS DELHI  २९ ऑक्टोबर  : एर्नाकुलम येथील योहावा Christian Convention Center ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. यावेळी परिसरात मोठी गर्दी होती. त्यामुळे काही वेळासाठी येथे भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्फोटात एकाचा मृत्यू, तर ३० हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईसह देशातील प्रमुख हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून केरळमध्ये एनएसजी, एनआयएची पथके केरळमध्ये पाठवली आहेत.Ernakulam serial blasts one killed

दरम्यान केरळमध्ये स्फोट झाल्याचे प्रकरण केंद्र सरकारही गांभीर्याने घेतले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून घटनेची माहिती घेतली.

स्फोटाच्या आधी एक दिवस केरळमधील मलप्पुरममध्ये जमात-ए-इस्लामीच्या सहयोगी संघटनेने हमासच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्यानंतर झालेल्या हा स्फोटांमुळे खळबळ उडाली आहे. केंद्र सरकार या स्फोटांना अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी तपास यंत्रणांना तपास पूर्ण होईपर्यंत केरळमध्येच थांबण्यास सांगितले आहे. सकाळी नऊ वाजता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सलग पाच स्फोट झाले. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला आहे. तर याशिवाय ३६ जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

एका दिवसापूर्वी येथील कॅथलिक चर्चने हमासचा निषेध केला होता. तसेच केरळमधील सभेत हमासचे माजी प्रमुख ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात, ते योग्य नाही. दहशतवाद्यांचा गौरव होता कामा नये असे चर्चने म्हटले होते. त्यानंतर काही तासांतच प्रार्थना सभेदरम्यान चर्चवरच हल्ला करण्यात आला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा